माझी रास काय आहे? व नावावरून रास शोधणे | How to Find Zodiac sign in Marathi

माझी रास काय आहे / नावावरून रास शोधणे : मित्रांनो, भारतीय ज्योतिष शास्त्र एखाद्या विज्ञानापेक्षा कमी नाही. अनेक ऋषि मुनि आणि साधू संतांनी ज्योतिष शास्त्राचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रात म्हणजे Astrology मध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टीची चर्चा केली जाते, ती गोष्ट म्हणजे राशी होय.

आज अनेकांना दिवस सुरू करण्याआधी स्वतः चे राशी भविष्य पाहण्याची सवय असते. परंतु आजही अनेक लोक असे आहेत ज्यांना स्वतः ची रास माहीत नाही आणि म्हणून हे लोक माझी रास काय आहे? अशी विचारणा करीत असतात.

जर आपणही यापैकीच एक असाल आणि नावावरून रास शोधणे कसे केले जाते याबद्दल जाणून घेण्याची इच्छा ठेवत असणार तर हा लेख शेवट पर्यन्त वाचा. कारण येथे आम्ही आपणास नावावरून राशी काशी माहीत करावी (How to Find Zodiac sign in Marathi) व तुमची रास काय आहे याविषयी चे मार्गदर्शन करणार आहोत.

माझी रास काय आहे
माझी रास काय आहे

माझी रास काय आहे? – How to Find Zodiac sign in Marathi

हा प्रश्न अनेक लोक विचारतात. कारण आजही अनेक लोक असे आहेत त्यांना त्यांची राशी माहित नाही. व म्हणून माझी रास काय आहे असे ते अनेकदा विचारतात. कारण राशि माहित नसल्याने स्वतःचे राशिभविष्य जाणून घेणे कठीण होते.

जर आपणही त्या लोकांमधून असाल ज्यांना स्वतःची राशी माहित नाही तर पुढे आम्ही आपणास 12 राशींची नावे देत आहोत व आपल्या नावाच्या पहिल्या अक्षराद्वारे आपण अतिशय सहज रित्या आपली राशि जाणून घेऊ शकतात.

पुढे आपणास नावावरून रास माहित करून घेण्यासाठी तक्ता दिलेला आहे. या तक्त्यात राशी पुढे व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर देण्यात आलेले आहे. यावरून आपण आपली रास माहित करून घेऊ शकता.

मेषचू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
वृषभई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुनका, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्कही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंहमा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्याढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तुळरा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिकतो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनूये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकरभो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभगू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीनदी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

महत्वाचे: नावाच्या पहिल्या अक्षरावरून राशि तेव्हाच ओळखता येईल, जेव्हा तुमचे नामकरण कुंडली पाहून ठेवलेले असेल. अन्यथा आजकाल मुला मुलींची नावे बंटी, बबली, विकी, ताऊ अशी वेगवेगळी ठेवली जातात. या नावांचा जन्म नक्षत्राशी काहीही संबंध नसतो. म्हणून जर आपले नाव ब्राह्मणाला विचारून नक्षत्र पाहून ठेवलेले नसेल तर नावाचे पहिले अक्षर पाहून आपण आपली अचूक राशि जाणून घेऊ शकत नाहीत.

जर आपल्या आई-वडिलांनी आपले नाव जन्म कुंडली न पाहता ठेवले असेल व आपणास आपली राशी माहीत नसेल. तर आपली राशी माहीत करून घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकतात.

आम्ही आपली कुंडली काढून आपणास आपली रास व कुंडली मधील इतर महत्त्वाची माहिती PDF स्वरूपात अतिशय कमी दरात (मात्र ₹20) पाठवून देऊ. माझी रास काय आहे माहीत करण्यासाठी आपण पुढील पद्धतीने आम्हाला संपर्क करू शकता.

बारा राशी नावे – Zodiac Sign in Marathi and English

जर आपणास 12 राशीची मराठी व इंग्रजी जाणून घ्यायची असतील तर आम्ही आपणासाठी पुढे बारा राशी नावे मराठी व इंग्रजीत (zodiac sign in marathi and english) देत आहोत. तर चला जाणून घेऊया:

  • मेष (Aries)
  • वृषभ (Taurus)
  • मिथुन (Gemini)
  • कर्क (Cancer)
  • सिंह (Leo)
  • कन्या (Virgo)
  • तूळ (Libra)
  • वृश्चिक (Scorpio)
  • धनु (Sagittarius)
  • मकर (Capricorn)
  • कुंभ (Aquarius)
  • मीन (Pisces)

राशी नुसार वागणूक व स्वभाव

व्यक्तीचे व्यक्तिमत्व, वागणूक व स्वभाव या गोष्टी खूप प्रमाणात त्याच्या राशी वर देखील अवलंबून असतात. पुढे आपणास राशी नुसार आपला स्वभाव कसा असतो व आपणास आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते याबद्दल माहिती देत आहोत.

मेष

मेष राशी च्या लोकांबद्दल चांगली गोष्ट म्हणजे हे लोक निराशा आणि संताप लवकर विसरतात आणि एखाद्या अबोध बालकाप्रमाणे पुन्हा वागू लागतात. मेष राशीचे लोक स्वभावाने भावूक असतात म्हणून ते प्रत्येक गोष्टीला शक्तिशाली प्रतिक्रिया करतात परंतु यामागील त्यांचा उद्देश कधीही वाईट नसतो. यांची निरागसता लोकांना आकर्षित करते. हे लोक चमत्कारी साहसी आणि फ्रेंडली स्वभावाचे असतात. परंतु यासोबतच जर धीर धरणे आणि कूटनिती हे गुण विकसित केले तर तुम्ही एक उत्तम नेता देखील बनू शकतात.

वृषभ

वृश्चिक राशीचे लोक आपल्या क्षमता खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. यांना धन संपत्ती व मानसन्मान प्रिय असतो. आपण दृढ निश्चयी आणि कठोर असतात. या राशीचे लोक कठीण कार्यही अतिशय सहजतेने पूर्ण करतात. या लोकांची उंची थोडी कमी असते परंतु स्वभाव अत्यंत आकर्षक असतो.

मिथुन

मिथुन राशीचे लोक स्वभावाने अस्थिर, परंतु आकर्षक व्यक्तित्व आणि चरित्राचे धनी असतात. यांना दररोज काहीतरी नवीन भटकंती आणि नाविन्यता प्रिय असते. मिथुन राशीचे लोक चांगले वक्त, हजर जवाबी असतात. मिथुन राशी चा स्वभाव चंचल असतो.

कर्क

कर्क राशीचे लोक भावूक आणि दुसऱ्यांच्या जीवनात अधिक लक्ष घालणारे असतात. या लोकांना आपल्या जन्मस्थळाशी खूप प्रेम असते आणि म्हणून यांना स्थान परिवर्तन पसंद नसते. अनेकदा जर मनासारखे झाले नाही तर यांना राग देखील येतो.

सिंह

सिंह राशीचे राशी चिन्ह देखील जंगलाचा राजा सिंहच आहे. ज्यापद्धतीने सिंह जंगलावर राज्य करतो अगदी त्याच पद्धतीने सिंह राशी असणारे लोक राजाप्रमाने जीवन जगतात. यांचा स्वभाव प्रेमळ पण निडर असतो. व वेळप्रसंगी हे लोकांना मदत करण्यासाठी इतर कसलीच पर्वा करत नाहीत.

कन्या

कन्या राशीचे लोक अभ्यासू आणि चौकस असतात. त्यांची ही प्रवृत्ती त्यांना करिअरमध्ये खूप सहाय्य करते. प्रत्येक गोष्टीचे अतिशय बारीक आकलन करून त्या गोष्टीला समजून घेणे तुम्हाला यश प्राप्ती करून देते. कन्या राशी चे विद्यार्थी व जॉब करणारे सर्वचजण आपल्या कार्यात चांगले यश मिळवतात. तुम्हाला खुर्चीवर बसून काम करण्यास आवडते व म्हणून बसून बसून काम मिळावे अशी तुमची जास्त इच्छा असते.

तुळ

या राशीचे जातक आपल्या गुणांचा योग्य उपयोग करणे अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतात. हे लोक नेतृत्व असेल तर असतातच, परंतु ते कोणावर लक्ष ठेवून आहेत हे इतरांना अजिबात कळू देत नाहीत. तुळ राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील तर असतातच परंतु त्यापेक्षा जास्त व्यावहारिक म्हणून कार्य करतात. ज्यामुळे ते आपल्यावर भावनांना हावी होऊ देत नाहीत. तुळ राशीचे लोक न्याय प्रिय असतात व विपरीत परिस्थितीत ते संयमी देखील असतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचे प्रेम संबंध खूप वेगळे असतात. हे लोक कायम कोणत्या तरी भ्रमात असतात. हे लोक प्रेमाचे भुकेलेले असतात व यांची शक्ती प्रेमच असते. वृश्चिक राशीचे जातक इतरांवर जास्त विश्वास करीत नाहीत ज्यामुळे कोणतेही कार्य ते स्वतःच पूर्ण करतात. हे लोक स्वभावाने तर प्रेमळ असतात परंतु अनेकदा खूप भावूक देखील होतात.

धनु

धनु राशीअसणारे लोक कोणतेही काम एक ध्येय म्हणून समोर ठेवतात. या राशीच्या लोकांना आपला वेळ वाया घालवणे अजिबात आवडत नाही. हे लोक श्रेष्ठ आणि ज्ञानी असतात. परंतु आपल्यात असणाऱ्या गुणांमुळे यांचा अहंकार देखील बऱ्याचदा वाढून जातो.

मकर

मकर राशीचे लोक मजबूत स्वभावाचे असतात. यांचे विचार सखोल असतात. आर्थिक कार्यात हे लोक अधिक सावध असतात. यांच्या मनात अनेकदा संशय निर्माण झालेला असतो. मनात संशय असणे ही त्यांची नकारात्मक बाब आहे.मकर राशी चे वैवाहिक जीवन सुखी असते. व हे लोक मनोरंजन मध्ये आपली विशेष आवड दर्शवतात.

कुंभ

मनाने स्वच्छ, निर्मल आणि कायम स्वतः पेक्षा दुसऱ्याबद्दल विचार करणारे कुंभ राशी असणारे जातक अतिशय साध्या प्रवृत्तीचे असतात. यांचे मन अतिशय स्वच्छ असते आणि कोणाचीही निंदा, चुगली न करणे यांच्या स्वभावातच असते. सदैव समाज आणि सर्वांना हितकारी ठरतील अशी कामे हे लोक करतात.

मीन

मीन राशि असणाऱ्यांना बंधनात राहायला आवडत नाही. हे लोक स्वातंत्र्य राहणे पसंत करतात. कला, संगीत आणि साहित्य लेखन यासारख्या क्षेत्रांमध्ये मीन राशि उत्तम कामगिरी करते. या राशीचे लोक अनेकदा विनाकारण खर्च करतात ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होते. परंतु तरीही यांच्याकडे संपत्ती ची कोणतीही कमी नसते. हे लोक रिलेशनशिप मध्ये रोमँटिक स्वभावाचे असतात.

तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपणास नावावरून रास शोधणे कसे करावे – How to Find Zodiac sign in Marathi आणि तुमचा सर्वात मोठा प्रश्न माझी रास काय आहे याचे उत्तर दिले आहे. आम्ही आशा करतो आपणास ही माहीती उपयोगाची ठरली असेल. हा लेख इतरांसोबतही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याविषयी ची माहीती प्राप्त होईल. धन्यवाद

Scroll to Top