एप्रिल महिना कसा जाईल? एप्रिल महिन्यात आपले आरोग्य कसे राहील, करियर, नोकरी, व्यवसाय आणि धन प्राप्ती संबंधी समस्या आपणास सतावत असतील तर या लेखात आम्ही आपल्यासाठी एप्रिल 2023 चे राशी भविष्य (April 2023 Horoscope in Marathi) घेऊन आलेलो आहोत. या लेखातील April 2023 Rashi Bhavishya in Marathi वाचून आपण येत्या महिन्याचे योग्य नियोजन करू शकता. तर चला सुरू करूया..

एप्रिल 2023 चे राशी भविष्य – April 2023 Rashi Bhavishya in Marathi
मेष
मेष राशीसाठी एप्रिल चा महिना अनेक आव्हानांनी भरलेला राहील. तरीही आपण योग्य विचार करूनच कार्य करणार. या महिन्यात कोणतेही कार्य सावध रित्या करावे व कोणतेही कार्य करण्याआधी त्याची रणनीती अवश्य बनवावी. या महिन्यात प्रेम संबंधांमध्ये गोड आणि आंबट दोन्ही गोष्टी घडतील. अधिक खर्च होऊ शकतो. ज्यामुळे तुम्ही मानसिक तणाव अनुभवू शकतात.
एप्रिलच्या या महिन्यात विरोधी अधिक सक्रिय होऊ शकतात. शेअर मार्केट व व्यवसायात विचार करूनच पैसा लावावा. अन्यथा हानी होण्याचे योग आहेत. म्हणून शक्य होईल तर कुठेही पैसे न लावणेच योग्य आहे. या महिन्यात बाहेर फिरण्याचे प्रयत्न कार्य नका. शक्य होईल तेवढे बाहेर निघा. कामाचा अधिक भार आल्याने त्यांना वाढू शकतो.
या महिन्यात भगवान विष्णूची आराधना केल्याने विरोधी शांत होतील व तुम्हाला कार्यामध्ये यश मिळेल.
वृषभ
एप्रिलच्या या महिन्यात वृषभ राशि साठी वेळ अनुकूल राहणार आहे. धावपळीच्या काळात अनेक सकारात्मक परिणाम मिळतील. प्रेम संबंधात अधिक गोडवा येईल. घर कुटुंबात जबाबदाऱ्या पूर्ण करणार. कोणासोबत तरी आंतरिक लगाव आणि प्रेमात वृद्धी होण्याचे योग आहेत. प्रयत्नात निरंतरता कायम ठेवावी.
विविध खेळांशी संबंधित खेळाडूंसाठी अनुकूल वेळ आहे. कोणतेतरी महत्त्वपूर्ण कार्य आपल्या पक्षात आणण्यासाठी आपण यशस्वी व्हाल. या काळात शेअर मार्केट आणि व्यवसायात पैसे गुंतवणे लाभदायक राहील. व्यापारी दृष्ट्या हा महिना चांगला आहे. बाहेर व विदेशात फिरण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी देखील वेळ अनुकूल आहे. अभ्यासात चित्त लागेल. एखाद्या मोठ्या परीक्षेत तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत.
अधिक फळप्राप्तीसाठी हनुमानाची उपासना व पूजा करावी.
मिथुन
मिथुन राशीसाठी एप्रिल च्या महिन्यात थोडा संघर्ष वाढेल. विविध कार्यांमध्ये उतार चढाव होऊ शकता. अनेक विषम परिस्थिती समोर येऊन उभ्या राहतील. म्हणून सावधानी ने कार्य करा. सतत केलेले प्रयत्न, क्रियाशीलता आणि तुमच्या अथक परिश्रम परिस्थितीला योग्य मार्गावर नेतील.
या महिन्यात आरोग्यावर विशेष लक्ष ठेवा. पोट संबंधी समस्या जसे अपचन, गॅस इत्यादी होऊ शकतात. वाहन चालवताना देखील सावधानी ठेवणे आवश्यक आहे.
व्यावसायिक दृष्ट्या देखील हा महिना अनुकूल नाही. म्हणून कुठलीही गुंतवणूक करताना विचार करून करावे. या महिन्यात मानसिक तणाव वाढू शकतो. म्हणून तणाव वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
उत्तम फळप्राप्तीसाठी या महिन्यात बुधवारी काळ्या वस्तूंचे दान करावे.
कर्क
कर्क राशीचे जातक या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुकूल परिस्थितीतून जातील. अनेक मोठे कार्य यादरम्यान होतील, परंतु महिन्याच्या मध्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुमचा कार्यात शीतीलता येईल. म्हणून कार्य संचलित करताना थोडी सावधगिरी ठेवावी .
या महिन्यात विरोधी व प्रतिस्पर्धी थोडा त्रास देऊ शकतात. परंतु योग्य विचार करून घेतलेले तुमचे सकारात्मक निर्णय उत्तम परिणाम देतील. अडचणी तर अनेक येथील परंतु व्यवस्थित विचार करून कुशल नेतृत्व केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. व्यावसायिक दृष्ट्या वेळ अनुकूल आहे.
दारू सिगरेट यासारख्या नशिल्या पदार्थांपासून या महिन्यात दूर राहावे.
सिंह
एप्रिलचा महिना सिंह राशीसाठी अनुकूल जाणार आहे. अनेक मोठे कार्य या महिन्यात घडतील. व्यापारच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. शेअर बाजारात पैसे लावले असता लाभ होऊ शकतो.
एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. या महिन्यात वाहन सुरक्षेचे नियम पाळायला हवे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे. कारण अपघात होण्याचे योग आहेत. एप्रिल 2023 चे राशी भविष्य या महिन्यात मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा प्रोग्रॅम बनवत आहे. मित्र आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम संबंधामध्ये मधुरता वाढेल व एकमेकांना समजून घ्याल.
या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्यास अधिक लाभ मिळेल.
कन्या
कन्या राशीसाठी एप्रिलचा महिना थोडा आव्हानात्मक असू शकतो. या काळात तुम्हाला सतत तुमची क्रियाशीलता आणि धैर्याचा परिचय द्यावा लागेल. विरोधी आणि प्रतिस्पर्धी प्रत्यक्ष व प्रत्यक्ष रूपाने तुमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.
व्यापारी दृष्ट्या वेळ अनुकूल नाही म्हणून कुठेही पैसे इन्वेस्ट करताना विचार करावा आणि शक्य झाल्यास काही दिवस थांबून घ्यावे.
महिन्याच्या सुरुवाती काळात घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. ज्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. या दरम्यान तुम्हाला जीवनसंगीची चांगली सोबत प्राप्त होईल व तुम्ही सोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार देखील करू शकता. महिन्याच्या शेवटच्या काळात काही कारणांवरून वादविवाद होऊ शकतात. म्हणून शक्य झाल्यास वाजवा टाळण्याचा प्रयत्न करावा व समजुतीने एकमेकांना समजावे.
या महिन्यात उत्तम फळ प्राप्तीसाठी गरिबांना काळ्या रंगाचे कंबल देणे उपयोगी ठरेल.
तुळ
एप्रिल 2023 चे राशी भविष्य: एप्रिलच्या महिन्यात तूळ राशी अनुकूल स्थितीत राहणार आहे. व्यापार आणि कार्यात गतिशीलता येईल. प्रेम संबंधांमध्ये मधुरता वाढेल. स्त्रियांची सोबत आणि सुख मिळण्याचे प्रबळ योग आहेत. ज्यामुळे या राशीचे जातक अति प्रसन्न होतील. बाहेरगावी फिरण्याचे योग बनत आहेत. देश-विदेश यात्रेवर जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या मूड चांगला राहील.
या महिन्यात तुमच्या भाग्यात वृद्धी होईल. योग्य ठिकाणी पैसा लावल्यास त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जे जातक आयात निर्यात शी जोडलेले आहेत ते यादरम्यान विशेष प्रगती करतील.
कौटुंबिक सुखात वाढ होईल. याशिवाय काही काम असतं थोडा विरोध होऊ शकतो. परंतु तुम्ही तुमची योग्य समझ आणि कौशल्याने सर्व गोष्टी आधी सारख्या करून टाकणार. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. एखाद्या परीक्षेत योग्य फळ मिळण्याचे प्रबळ योग आहेत.
वृश्चिक
वृश्चिक राशी असणाऱ्यांसाठी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करियर संबंधी खुशखबर मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात देखील लाभ होईल. प्रतिष्ठेत वृद्धी होईल. परंतु तुम्हाला पाहून जळणाऱ्यांची वाढ देखील होईल. काही क्षणांसाठी कठीण वेळ येऊ शकते परंतु तुम्ही विनम्रतेने त्यावर विजय मिळवणार.
कार्यस्थळी एखाद्या जुन्या सहकार्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आर्थिक लाभ होईल. परंतु कुटुंबात वाद विवाद होण्याचे देखील योग आहेत. यादरम्यान व्यापार संबंधीच्या यात्रा टाळणे योग्य आहे.
महिन्याच्या अंतिम काळात दीर्घ काळापासून सुरू असलेला एखादा वाद मोकळा होईल. कुटुंबात कोणाशी बोलाबोल झाली असेल तर ती दूर होईल. महिन्याच्या शेवटी नवीन संपर्क स्थापित होतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
धनु
धनु राशीसाठी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व स्थिती अनुकूल आहेत. तुमच्या कौशल्यामुळे तुमची जयजयकार होणार आहे. चारही दिशांनी तुमची प्रशंसा केली जाईल. याच दरम्यान तुमच्यासोबत छलकपट देखील होईल. आपल्यापेक्षा अधिक शक्ती संपन्न लोकांशी न भिडलेलेच चांगले. या महिन्यात तुमचे आरोग्य प्रभावित होऊ शकते.
महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात व्यापारात वृद्धी आणि कमाई मध्ये वाढ होण्याची योग दिसत आहेत. दीर्घ काळानंतर सुखद अनुभवाची प्राप्ती होणार आहे. परंतु निरर्थक मानसिक दबाव तुमची बैचेनी वाढवू शकतो. म्हणून अधिक विचार करणे टाळावे.
महिन्याच्या अंत मध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत तक्रार होऊ शकते. ज्यामुळे क्षणिक आर्थिक तणाव होऊ शकतो. आरोग्यावर लक्ष ठेवा. चांगले फळ प्राप्ती साठी हनुमान चालीसा चे पाठ करावे व भगवान विष्णूची दररोज आराधना करावी.
मकर
या महिन्यात व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या जातकांची विशेष प्रगती होणार आहे. या महिन्यात देवी दुर्गे सोबत भगवान शंकराची देखील उपासना करावी. 17 ते 26 एप्रिल पर्यंत सूर्य मीन राशीत गोचर करणार असल्याने याच्या फायदा पॉलिटिशन व राजनीतिक संबंध ठेवणाऱ्यांना होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. परंतु यश प्राप्तीसाठी नेहमी पेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. नौकरी करणाऱ्या जातकांसाठी कार्यस्थळी कामाचा ताण वधू शकतो. हा ताण महिन्याच्या शेवट पर्यत कमी होईल.
एप्रिल महिन्यात आपला शुभ रंग नारंगी आणि लाल आहे. या महिन्यात विशेष फळ प्राप्तीसाठी तिळाचे दान करावे.
कुंभ
कुंभ राशी या महिन्यात नोकरीत राहिलेली कार्य पूर्ण करणार. 14 ते 24 एप्रिल च्या मध्यात आर्थिक स्थिती सुधारायला सुरुवात होईल. दररोज वडिलांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने कुंडली मधील सूर्य मजबूत होईल. 14 एप्रिल नंतर सूर्य व गुरु चे गोचर धन प्राप्ती करून देणारे आहे. 14 ते 28 एप्रिल च्या मध्यात धार्मिक कार्य होतील. राजनीति शी जुडलेले लोक यादरम्यान प्रगती करतील.
या महिन्यात कुटुंबासोंबत बाहेर देव दर्शनाला जाणे चांगले राहील. बाहेरगावी फिरण्याचे योग बनत आहेत. आरोग्याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.
या काळात निळा व हिरवा रंग शुभ आहे. दररोज सप्तश्लोकी दुर्गा चे 09 वेळा पाठ करावे.
मीन
मीन राशीसाठी एप्रिल महिना कठीण दिसत आहे. अचानक नोकरीत बदल अथवा नोकरी सुटण्याची संभावना आहे. आरोग्य कडे लक्ष द्यावे खर्च वाढू शकतात. बॉस शी बोलताना तुम्हाला वाणीत मधुरता ठेवणे आवश्यक आहे, कुटुंबाची मदत मिळेल, कुटुंबात काहीतरी मंगल कार्य आयोजित होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायात वरिष्ठ लोक खर्च करू शकतात. या काळात जर तुम्ही आपली वाणी गोड ठेवली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.
सर्वांशी प्रेमाने व अजिबात राग न येऊ देता कार्य करावे. महिन्याच्या शेवट कुटुंबात काहितरी मंगल कार्य घेऊन येईल.
या महिन्यात आपला शुभ अंक 4 व शुभ रंग पांढरा आहे.
April 2023 Horoscope in Marathi : मंडळी अशा आहे वरील लेखातील एप्रिल 2023 चे राशी भविष्य (April 2023 Rashi Bhavishya in Marathi) वाचून आपणास आपले येत्या महिन्यातील भविष्य काय आहे याविषयी माहिती प्राप्त झाली असेल आणि त्या दृष्ट्या आपण योग्य निर्णय देखील घेतले असाल. जर आपण नियमित पणे दैनिक राशी भविष्य वाचण्याची आवड ठेऊन असाल तर आपण आमच्या वेबसाइट ला https://horoscopemarathi.com/ भेट देऊ शकता. धन्यवाद